Posts

Showing posts from July, 2020

बाबासाहेब आणि मंत्रिपद

🔴 बाबासाहेब आणि मंत्रिपद🔴 घटना समितीमध्ये 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांनी जे उत्स्फूर्त भाषण केले, त्यामध्ये त्यांच्या चित्तवृत्तीत आयुष्यभर साठवून ठेवलेली वेदना आणि राष्ट्रभक्ती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी उचंबळून आल्या. जिव्हाळा आणि जोश यांनी ओतप्रोत भरलेला शब्दांचा तो प्रभात होता. त्या प्रपातात त्यांच्या विषयीचे सर्वच पूर्वग्रह आणि संशय वाहून गेले.  घटना समितीचे अध्यक्षपद खरे तर त्याच दिवशी हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले होते. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी झालेली घोषणा हा केवळ उपचार होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून समावेश झाला. या घटनेबद्दल डॉ .सोहनलाल शास्त्री यांनी आपल्या आठवणीच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे  "सारा भारत जगत हैरान था कि कांग्रेस का आलोचक और गांधीजी को महात्मा मानने वाला आंबेडकर भारत मंत्रीमंडळ मे कैसा लिया गया" ? हे मोहनलाल शास्त्री बाबासाहेबांच्या अत्यंत विश्वासातले पंजाबी जन्मदलित होते. त्यांचे चार भाषांवर प्रभुत्व होते पंजाबी, उर्दू, हिंदी, आणि इंग्रजी मसुदा समितीला अशाच विद्वान आणि ...