शहरीकरण हे सध्याचे वास्तव, बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होते'
'शहरीकरण हे सध्याचे वास्तव, बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होते' Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Sep 2020, 06:34:00 PM PM Narendra Modi : बिहारमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीची घोषणा पुढच्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील बिहारमधील सात प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होतेः पंतप्रधान मोदी नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील विविध नागरी सुविधांच्या सात प्रकल्पांचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. यापैकी चार प्रकल्प पाणीपुरवठ्यासंबंधी आहेत. तर दोन प्रकल्प सांडपाण्याचे असून, एक नदी सुधारणेशी संबंधित आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी छठ पूजा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत राजकीय समीकरण सांधण्याचा प्रयत्न केला. यासबोतच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू ...