शहरीकरण हे सध्याचे वास्तव, बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होते'
'शहरीकरण हे सध्याचे वास्तव, बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होते'
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Sep 2020, 06:34:00 PM
PM Narendra Modi : बिहारमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीची घोषणा पुढच्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील बिहारमधील सात प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला.
बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होतेः पंतप्रधान मोदी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ( BR Ambedkar ) शहरीकरणाचे महत्त्व त्याच काळात लक्षात आले होते. ते शहरीकरणाचे ( urbanisation ) मोठे समर्थक होते. गरीबांना सर्व सुविधा आणि संधी उपलब्ध होतील अशा शहरांची कल्पना त्यांनी त्यावेळी मांडली होती. म्हणजेच पुढे जाण्यासाठी अशा शहरांमधून तरुणांना अनेक संधी मिळतील. बिहारचे नागरीकही भारताच्या शहरीकरणात आपले योगदान देत आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी बिहारमधील १६ टक्के दलित मतांना सांधण्याचा प्रयत्न केला. बिहारमधील बहुतांश दलित मतं ही लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची एकगठ्ठा मतं समजली जातात.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी ५४१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विविध नागरी सुविधांच्या सात प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अवघा देश वीर जवानांसोबत उभा आहे : राजनाथ सिंह
मृत प्रवासी मजुरांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई? सरकारनं दिले 'हे' उत्तर
सात प्रकल्पांमध्ये सिवान नगरपरिषद आणि छपरा महापालिकेद्वारे 'अमृत मिशन'अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पामुळे स्थानिकांना चोवीस तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तसंच, 'नमामि गंगे'अंतर्गत मुझफ्फरपूर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. 'अमृत मिशन' अंतर्गत मोदींनी मुंगर पाणीपुरवठा योजनेचंही उद्घाटन केलं.
Comments
Post a Comment