रामू
✒️ #रामू...#रामू...#बोल...
*_काय होतंय तुला ? पाणी देऊ ? का औषध देऊ ? काय देऊ रामू तुला ? 'रमाई तडफडतच एक एक शब्द बोलल्या,' साहेब...आता मला काही काही नको...मला सारं सारं काही मिळालं...मी आता संतुष्ट आहे.तृप्तआहे... डॉक्टरांना कशाला बोलावता आता...थोड्या क्षणाची मी मालकीण आहे...माझं डोकं आता तुमच्या मांडीवर घ्या... 'पत्नीसाठी विव्हळ झालेले बाबासाहेब रमाईचं डोकं मांडीवर घेऊन बसले. लक्ष्मीबाई डोळे पुशीत बोलल्या, 'गौराबाई रमाला कुंकू लावा.करंडा तिथंच असंल बघा.सुवासिन हाय ती... 'गौराबाईनं करंडा घेऊन प्रथम स्वतःच्या कपाळी कुंकू लावलं.नंतर रमाईंच्या कपाळी लावलं.कुंकू लावून होताच, पतिव्रता साध्वी रमाई,त्या तशातही एखाद्या देवीसारख्या तेजस्वी दिसू लागल्या. 'साहेब, असं रडू नका हं...माझ्या पतिदेवाच्या मांडीवर मला मरण येत आहे...माझं हे मरण म्हंजी अहेव मरण आहे. भरल्या चुड्यांनी मी देवाघरी जात आहे...कपाळी कुंकू लेवुन,सवासिन म्हणून जाते हाय...साहेब...मोक्षाची मी धनीण झाली आहे...मग असं रडता का...मला हसत निरोप द्या...माझी शपथ आहे...असं रडू नका...'रमाबाईंनी आपला कृश हात वर करुन,साहेबांचे सतत वाहणारे अश्रू पुसण्याचा निष्फळ प्रयत्न केला,पण त्यांचा तो हात खळकन खाली गळून पडला.साहेबांची तेजःपुंज मूर्ती हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच,रमाईची नेत्रद्वारे खाडकन् झाकली गेली. बाबासाहेब काय समजायचे ते सारे समजून चुकले.अंगात होतं नव्हतं सारं बळ एकवटून ते ओरडले, 'रामू...घड्याळात बरोबर सकाळचे नऊ वाजले होते...पहाडासारखे अचल बाबासाहेब,एखाद्या वेलीसारखे उद्ध्वस्त होऊन, रमाईच्या अंगावर उन्मळून पडले. वेड्यासारखे ओरडू लागले,' 'रामू... रामू...रामू... रामू...' ही त्यांची ती आर्त किंकाळी साऱ्या' 'राजगृहात ' घुमत राहिली.कितीतरी वेळ. डॉक्टर व शंकर धावत धावतच राजगृहात आले.पण त्यापूर्वीच रमाईचं प्राणोत्क्रमण झालेले. जळता जळता कापूर नाहीसा व्हावा,तशा रमाई गेल्या. पंचतत्वात विलीन झाल्या. अजून बाबासाहेब रमाईच्या अंगावर पडून स्फुदून स्फुदून रडतच होते त्यांच्या इष्टमित्रांनी त्यांना रमाईच्या अंगावरुन दूर करण्याचा प्रयत्न केला,पण साहेब काही केल्या काही ऐकेनात.साहेब दाटल्या गळ्याने बोलले.'आम्हा दोघांना माझ्या वडिलांनी,दैवाने असं जन्मोजन्मीचे साथी म्हणून एकत्र केलं असताना,आम्हाला दूर करणारे तुम्ही कोण रे?' साहेबांचे हे बेबींच्या देठापासून पिळवटून आलेले 'उद्गार ' ऐकून,त्यांची इष्टमित्र मंडळीही त्यांच्याबरोबर धाय मोकलून रडू लागली.आकांत करु लागली.राजगृह शोक - सागरात बुडाला ! 'टॉबी' कुत्राही एका बाजूला बसून अश्रू गाळीत होता._*
#माझी_आई_रमाई..!
#स्टार_प्रवाह_महामानवाची_गौरवगाथा_या_निमित्ताने📺
*तुमच्याकडील ग्रुपमध्ये मला ऍड करा*
आपलाच
निरंजन गायकवाड
9421489900
Comments
Post a Comment