बहुतेक लोकांनी अगदी बरोबर उत्तरे दिली आहेत. संस्कृत मध्ये "कर" म्हणजे हात असा अर्थ होतो.पण पंजाबी मधे कर ह्या शब्दा चा उच्चार कार असा करतात. आणि इंग्रजी मधे लिहिले तर "kar" हा car सारखा "कार" होतो. त्यामुळे कर सेवा म्हणजेच पैसे न घेता,स्वेच्छेने केलेली फुकट सेवा असा होतो. शिखांच्या गुरुद्वारा येथे पुष्कळ लोक ही "कार" सेवा करतात, किंवा करायला जातात.
🔴लंगर (प्रसादाचे) जेवण तयार करणे,
🔴साफ सफाई करणे,
🔴भांडी घासणे,
🔴जेवण वाढणे,
🔴जोडे सांभाळणे किंवा
🔴पॉलिश करणे वगैरे कामे "कार" सेवे मधे समाविष्ट असतात.
मराठीत आपण श्रमदान सुद्धा म्हणू शकतो. एकूण कार सेवक म्हणजे स्वयं सेवक किंवा volunteer.
इंग्रजीतील Karsevak या शब्दाचा ज्या कुणी पत्रकाराने कारसेवक हा अनुवाद केला त्याला पहिल्यांदा नमन. मूळ शब्द करसेवक असा आहे. कर म्हणजे हात अधिक सेवा.. कोणतीही अपेक्षा न ठेवता जी सेवा होते त्यास करसेवा म्हणतात. व ही सेवा करणारा तो करसेवक. सर्वसाधरणपणें धार्मिक कृत्यांशी निगडित हा शब्द वापरला जातो. मराठीत अधिक वापरला जाणारा शब्द म्हणजे सेवेकरी.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर ‘कारसेवक’ हा शब्द चर्चेत आला आहे. लाखो कारसेवकांनी राममंदिर निर्माण आंदोलनात सहभाग घेतल्याचे म्हटले जाते. कारसेवक या शब्दातील कारचा आपण समजतो त्या कार वाहनाशी अजिबात संबंध नाही.मुळात कारसेवक हा संस्कृत शब्द आहे. यामध्ये ‘कार’ म्हणजे कर आणि ‘सेवक’ म्हणजे सेवा देणारा.जी व्यक्ती निस्वार्थ भावनेने सेवा देते आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी पाऊले उचलते त्यांना कारसेवक म्हणतात.
हा शब्द शिख धर्मात पुर्वी पासून वापरात आहे. त्यांच्यात धार्मिक सेवकांना कारसेवक असे संबोधले जाते.
माझ्या माहितीनुसार :
“कार” हा फारसी शब्द आहे. याचा अर्थ “काम” “कार्य” “पेशा” वगैरे.
उदाहरणार्थ: कार-खाना (खाना म्हणजे जागा दवा-खाना ..) जिथे काम चालते ते जागा म्हणजे कारखाना..
कार सेवक याचा अर्थ विनामुल्य श्रम करणारा.. (सेवा म्हणून श्रम करणारा.. निस्वार्थीपणे देखील म्हणू शकतो)
अशी व्यक्ती आहे जी धार्मिक कारणासाठी विनामूल्य सेवा देते. हा शब्द कर (हात) आणि सेवक (नोकर) या संस्कृत शब्दातून आला आहे. कार सेवा" म्हणजे १ Sikhs.. मध्ये शीखांनीअमृतसरयेथील सुवर्ण मंदिर पुनर्संचयित करण्यासाठी स्वतंत्र स्वेच्छा कार्य केले होते जे बंडखोर आणि सैन्याच्या लढाईमुळे खराब झाले होते.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनेआयोजित केलेल्या कारसेवक बाबरी मशीद पाडण्यास जबाबदार होते. शीख लोक सेवा सेवक या शब्दाचा उपयोग धर्म आणि समाजाच्या सेवेसाठी (प्रामुख्याने संरचने तयार करण्यासाठी) केलेल्या सेवा, परोपकारी परोपकार आणि मानवतावादी प्रयत्नांमध्ये गुंतलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी करतात.
माफ करा सर मलाही कारसेवकांबद्दल फारसं काही माहिती नाही पण जेव्हा जेव्हा त्या बाबरी मशीदीचे प्रकरण किंवा ते गोध्रा रेल्वे प्रकरण बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रात छापून यायचे तेवढीच जुजबी माहिती आहे त्यामुळे मी आपल्या प्रश्नाच परीपुर्ण उत्तर देण्यास असमर्थ आहे.
राममंदिर उभारण्यात "हातभार" लावण्यासाठी जे सेवक जात होते, त्यांना करसेवक म्हणतात. करसेवा व करसेवक ह्याचा अपभ्रंश होऊन कारसेवा व कारसेवक हा शब्द आला
कार सेवक नाही तर कर सेवक म्हणजे जो काही एखाद्या ठिकाणी जाऊन स्व हस्ते सेवा करतो तो शेगाव ला आहे हे
धार्मिक स्थळी मोफत व स्वेच्छेने सेवा म्हणजे कारसेवा
फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ११) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेसाठीचे पहिले पाऊल म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह होय....! आरएसएस चा समतेवर पहिला हल्ला......! २४ सप्टेंबर १९२४ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दल स्थापन केले होते.त्यानंतर संपूर्ण समाजात जनजागृती करून प्रबोधन करून कायस्थ प्रभू यांना जवळ करून मनुस्मृती दहन करण्याचे ठरविले होते.महाड येथील चवदार तळे आरएसएस वादी लोकांनी अस्पृश्यांसाठी बंद केले होते.समतेचा राजा शिवछत्रपतीच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगडचा हा परिसर होता.ज्या शिवरायांनी सप्तबंदी मोडीत काढीत शुद्र म्हणणाऱ्या वैदिक धर्म पंडितांच्या राज्याभिषेकाला नाकरून शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्याभिषेक करून समता प्रस्थापित केली होती.अशा परिसरात अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवट्यापासून वंचित ठेवले होते.ही बाब स्वराज्यासाठी शरमेची बाब होती.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्या...
फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १३) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेसाठीचे तिसरे पाऊल म्हणजे काळाराम मंदिर प्रवेश होय....! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले समतेचे आंदोलन हे चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या माध्यामतून केले आहे.आणि त्यांचे दुसरे आंदोलन हे मनुस्मृती दहन करून केले येथे त्यांना आरएसएसवादी व्यवस्थेने मोठ्या जोमाने विरोध केलेला आहे.तरीही या विरोधाला न जुमानता हल्ल्याला कोणतेही प्रतिहल्ल्याने उत्तर न देता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता प्रस्थापित करण्याचे कार्य सुरूच ठेवले होते.येथे त्यांनी कायस्थ प्रभू सहस्त्रबुद्धे यांना बरोबर घेतले होते.म्हणजे आर्य सनातनी ब्राह्मणी व्यावस्थेच्या विरोधात योग्य तो संदेश दिलेला होता.आता प्रश्न काळाराम मंदिराचा उभा राहिला होता प्रश्न देवाचे दर्शन घेणे नव्हते.प्रश्न असा होता की , आर्य सनातनी हिंदू धर्मात कोणतीही समानता नव्हती हे दाखविण्यासाठी हे एक प्रबोधन आंदोलन होते येथेही डॉ बाबासाहेब ...
Comments
Post a Comment